You are currently viewing एस.टी.कामगारांचे वेतन तात्काळ द्या.;महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

एस.टी.कामगारांचे वेतन तात्काळ द्या.;महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

कुडाळ /-


एस.टी.कामगारांचे वेतन तात्काळ द्या.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे एसटी प्रशासनाला आवाहन केले आहे.कोरोना लाॅकडाऊन मुळे आर्थीक अडचणीत आलेली महाराष्ट्राची जिवनवाहीनी एस.टी.व त्यावर ऊपजिवीका करणारे एस.टी.कामगार अत्यंत आर्थीक अडचणीत सापडले आहेत.म.न.रा.प.का.सेनेने यापुर्वीच नियमित वेतनाबाबत शासन व एस.टी.प्रशासनास निवेदने दिली आहेत.परंतु मागीलप्रमाणे वेतनविलंबामुळे एस.टी.व एस.टी.कामगारांचे हाल होत आहेत.ऊपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी एस.टी.ला ६०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली ७ तारीख ऊलटली तरीही वेतन न झाल्याने एस.टी.कामगार चिंतेत पडले आहे.सदर समस्या,म.न.रा.प.का.सेनेकडे कामगारांनी मांडल्या आहेत.या समस्यांबाबत म.न.रा.प.का.सेना. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांनी परिवहन मंत्री मा.अनिल परब यांचेसोबत संपर्क करुन विलंबवेतनाबाबत समस्या मांडल्या आहेत.एस.टी.कामगारांचे वेतन त्वरीत न झाल्यास महाराष्ट्रव्यापी निषेध आंदोलन करण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने केली आहे.असे आज कुडाळ येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..