आचरा पंचक्रोशीतील उपकेंद्रांसाठी प्रकाश मेस्त्री ठरताहेत आरोग्यदूत..

आचरा पंचक्रोशीतील उपकेंद्रांसाठी प्रकाश मेस्त्री ठरताहेत आरोग्यदूत..

सुविधा इंस्ट्यूट्यूट च्या माध्यमातून चिंदर, त्रिंबक, बांदिवडे उपकेंद्रांना दिले औषधे आणि आरोग्य साहित्य उपलब्ध करून..


आचरा /-

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिवसरात्र सेवा देणारया आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी साधनसामग्री अपुरी पडत आहे याची दखल घेत चिंदर येथील उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी पुढाकार घेत सुविधा इन्स्टिट्यूट आँफ टेक्नॉलॉजी मुंबई च्या माध्यमातून तीन उपकेंद्रांना प्रत्येकी पंधरा हजाराची औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन दिले आहे त्यांच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले जात आहेत.
आचरा पंचक्रोशीत सध्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यांना वैद्यकीय सेवा देणारया आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गरजेचे साहित्य मिळाल्यास त्यांच्या साठी ते सध्या आवश्यकच बनले आहे. या द्रूष्टीने विचार करून आणि उपचारासाठी आवश्यक ती औषधे उपलब्ध करावी या हेतूने चिंदर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी मुंबई येथील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून चिंदर, त्रिंबक, बांदिवडे या उपकेंद्रांना सँनिटायझर,हँड ग्लोज,मास्क आदी वैद्यकीय साहित्यासह औषधे उपलब्ध करून दिली. याचे वितरण संबंधित उपकेंद्रांना उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते केले गेले, चिंदर येथील उपकेंद्रांला सरपंच राजश्री कोदे यांच्या उपस्थित मेस्त्री यांनी वैद्यकीय साहित्य आणि औषधे प्रदान केली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,उपसरपंच दिपक सुर्वे,संतोष गांवकर, दत्ता वराडकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर,पोलीस पाटील दिनेश पाताडे,भाई तावडे मोरेश्वर गोसावी, हितेंद्र तिरोडकर,आरोग्य कर्मचारी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या सहकार्याबद्दल आरोग्य विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..