वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील माझा – वेंगुर्ला ही संस्था कोव्हिड काळात करत असलेल्या कार्याने प्रभावित होऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट दिले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, शासनाची आरोग्य यंत्रणा ही मनुष्यबळ अभावी कोलमडलेली आहे.परंतु त्यामधुन सावरण्यासाठी माझा – वेंगुर्ला ही संस्था आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मदत करत आहे.वेंगुर्ले तालुक्याच्या मूलभुत आरोग्य सुविधेला बळकट करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ” आम्ही वेंगुर्लेकर सक्षम ” अभियानाला पण राजन तेली यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी माझा – वेंगुर्ला या संस्थेचे सदस्य नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आगामी काळात घेण्यात येणाच्या उपक्रमांची माहिती दिली व ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर संस्थेस भेट दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आभार मानले.
यावेळी या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्य.सदस्य शरदजी चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,
नगराध्यक्ष दिलीप गिरप,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माझा – वेंगुर्ला चे अध्यक्ष निलेश चेंदवणकर , सचिव – राजन गावडे,शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, वसंत तांडेल,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, ज्येष्ठ पत्रकार,के.जी.गावडे,माझा – वेंगुर्ला चे – अॅड. सूर्यकांत प्रभु खानोलकर,संजय पुनाळेकर, अवधुत नाईक,मोहन होडावडेकर,संदिप परब,अमृत काणेकर,राज पोकळे,प्रथमेश भोगले,यासिर मकानदार,शरद मेस्त्री,निता आंगचेकर,श्रृती गायचोर तसेच माझा – वेंगुर्ला संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page