वेंगुर्ला /-


उभादांडा ग्रामपंचायत नियंत्रण समिती, आरोग्य विभाग व पोलीस खाते यांच्या वतीने उभादांडा येथे २ जून ते ४ जून या कालावधीत सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम राबविण्यात आली. २ जून रोजी ५० व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट, ३ जून रोजी ५० व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट व ४ जून रोजी २० व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट व ३५ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली,त्यामध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. तर आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट्स प्राप्त झालेले नाहीत. या मोहिमेत उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, ग्रा. पं. सदस्य गणेश चेंदवणकर,मधुकर तिरोडकर,आंदृ फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी, डॉ. लिंगायत, आरोग्य सेविका दळवी,इदालिन डिसोजा, वाईरकर व आरोग्य कर्मचारी, पोलिस अधिकारी तसेच तुषार साळगावकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page