वजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध..

वजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पंचायत समिती मतदार संघातील वजराट शाळा नं.१ येथे बोअरवेलसाठी १५ व्या वित्त आयोगातून पं. स.सेस मधून दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.वेंगुर्ले पं. स.सदस्य,माजी
सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या बोअरवेलचा कामाचा शुभारंभ शुक्रवारी यशवंत उर्फ बाळू परब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी श्री गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन बाबुराव परब,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी,वेंगुर्ले खरेदी विक्री संघ संचालक अण्णा वजराटकर,ग्रा.पं.उपसरपंच नितीन परब,ग्रामसेवक सद्गुरु गावडे, माजी सरपंच अनंत परब,ग्रा.पं. सदस्य प्रेमानंद भोसले,विजय नळेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत परब,सदस्य शेखर परब,मुख्याध्यापक परब,शिक्षक तेजस बांदिवडेकर,जयंत वजराटकर,ग्रा.पं. कर्मचारी मोरे,प्रविण गावडे,माजी ग्रा.पं.
सदस्य दिगंबर पेडणेकर, सावळाराम नळेकर,मितेश परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या शाळेच्या ठिकाणी बोअरवेल झाल्याने कायमस्वरुपी पाण्याची सोय होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.दरम्यान आपल्या मतदारसंघात तसेच तालुक्यात विकासकामे राबविण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे बाळू परब यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..