कुडाळ /-
नानेली येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. नानेली या ठिकाणच्या कोविड स्थितीचा त्यांनी आढावा घेत गावातील कोविड उपाययोजनांबाबत संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. नागरिकांच्या लसीकरणाबाबतही सूचना केल्या.नानेली येथे आमदार वैभव नाईक यांच्या सोबत कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी, योगेश धुरी, कौशल जोशी, सरपंच प्रज्ञेश धुरी, मुख्याध्यापक सरिता गोलतकर, ग्रामसेविका चेतना म्हाडगूत, परशुराम घाडी आदी उपस्थित होते.