कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील हुमरस येथील प्राथमिक शाळेत ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असून आज ४ जून रोजी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. ज्यांना कोरोना रुग्णांना लक्षणे आहेत त्या नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ कोविड टेस्ट करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.यावेळी हुमरस येथे जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर,सरपंच अनुप नाईक, कृष्णा धुरी, उपसरपंच महादेव परब, ग्रामसेवक सौ. राऊळ, आरोग्य अधिकारी सोनिया कदम, आरोग्य सेविका वैदेही पडते,केंद्रप्रमुख श्री. चव्हाण, मुख्याध्यापिका दीप्ती तळवणेकर, शिक्षिका स्नेहा परब, तलाठी पीटर लोबो, झोनल ऑफिसर श्री. सावंत,यासंह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.