पूर्वीच्या केंद्र सरकारप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे..

पूर्वीच्या केंद्र सरकारप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे..

जिल्हाधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेच्यावतीने निवेदन..

सिंधुदुर्ग /-

पूर्वीची केंद्र सरकारे ज्याप्रमाणे मोफत व नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करत होते त्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे करण्यात आली.केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने लसीकरण मोफत लवकरात लवकर होण्यासाठी केंद्र सरकारपर्यंत मागणी पोहोचण्यासठी जिल्हाधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षात अनेक प्रकारच्या रोगांवर अनेकदा यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे. त्यावेळी ही लस केंद्र सरकार देणार की राज्य सरकार देणार , त्या लसीची किंमत किती, ती कधी मिळणार, असे प्रश्न जनतेला कधी पडले नाहीत. त्यावेळच्या केंद्रसरकारने राष्ट्रीय अभियानांतर्गत देशातील नागरिकांना लस मोफत पुरविली होती. मात्र आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने देशातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. देशात हजारो लोक कोरोनाने मरत असताना आपल्या देशातील उत्पादित लसी इतर देशांना पुरवून भारतीय लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे पाप मोदी सरकार करत आहे. जगाच्या तुलनेत भारत देश लसीकरणात सर्वात मागे आहे. लसीकरणाची जबाबदारी ही सर्वस्वी केंद्र सरकारची असताना ती राज्य सरकारवर ढकलण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ञ देत असताना संथ गतीने होत असलेले लसीकरण घातक ठरू शकते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, खासदार राहुल गांधी यांनी जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारला सल्लाही दिला आहे, मात्र मोदी सरकार आपल्या मनमानी कारभारामुळे याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागणीचा विचार करून पूर्वीची केंद्र सरकारे ज्याप्रमाणे मोफत व नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करत होते त्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा, अशी मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..