वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्ती,पेंडूर २,अणसूर २,वायंगणी ४,कामळेवीर ३,भेंडमळा १,तुळस १,होडावडा ६, कनयाळ १,शिरोडा १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात ७३ अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आले होते.यामध्ये उभादांडा ५,मातोंड ३,होडावडा न्हईकरवाडी ९,होडावडा भोजवाडी १८,दाभोली ४,कनयाळ १,भेंडमळा १,म्हापण १,कर्ली २,गवाण १,रेडी १,शिरोडा २,वेतोरे ८,मठ ८,आडेली १,तुळस ५ व वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.