वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना भाजपच्या वतीने ताडपत्र्यांचे वाटप..

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना भाजपच्या वतीने ताडपत्र्यांचे वाटप..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील चक्रीवादळग्रस्तांना ताडपत्र्यांचे वाटप नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील नुकसानग्रस्त पुॅमलास राॅबर्ट डिसोझा,सतीष हरीशचंद्र वेंगुर्लेकर,हेमलता हेमेंद्र केरकर ,अतुल सुनील केरकर,रामदास चंद्रकांत हळदणकर,शाम साठे यांना नगराध्यक्ष यांच्या हस्ते ताडपत्री वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जाॅन्सन आगोस्तीन डिसोझा आदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दुसऱ्या वर्षपुर्ती निमित्ताने वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.या सेवा सप्ताहात विविध सेवा कार्य हाती घेऊन जनमानसात भाजपाची विचारधारा पोहचविण्यात येत आहे.सेवा सप्ताहाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम आयोजित करुन भाजपाची प्रतिमा एक सेवाभावी पक्ष म्हणून समाजात रुजवली जात आहे.तौक्ते चक्रिवादळात नुकसान झालेल्या गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते कामाला लागले आहेत.ठिकठिकाणी मदतकार्य हाती घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..