वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ३९ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ३९ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात सोमवार ३१ मे व आज मंगळवार १ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३९ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ १,शिरोडा १,केरवाडा १,आडेली १,वेतोरे १,वायंगणी १,तुळस १,चिपी १,खानोली १,होडावडा २,आसोली ६,कनयाळ २,रेडी ४,टाक ८ आणि वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती इत्यादींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान तालुक्यात रविवारी ३० मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ३३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये उभादांडा १,दाभोली १,म्हापण ३,मळई ३,परुळे १,भोगवे १,कोचरे १,मठ ३,वेतोरे ४,तुळस ४,होडावडा १,भेंडमळा ४,मातोंड २,मोचेमाड १ आणि वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिप्राय द्या..