कुडाळ /-


कोकणी शेतकऱ्याला वाली कोण?अशी एक गंभीर स्वरूपात आरोप असलेली फेसबुक वर लिहलेली पोस्ट शेतकरी अभिषेक दळवी रा. मालवण यांनी कृषी विद्यापीठ मुळदे यांचे विरोधात अधिकारी रोपे दयायला अडचणी निर्माण करता व नीट माहिती देत नाही तसेच तेथील अनाठायी कारभारावर व त्यांच्या अधिकाराकडून भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला होता व ही विरोधात लिहिलेली फेसबुक वरची पोस्ट बरीच प्रसारित झाली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून सदरची बाब कानावर घातली.
लागलीच सदर घडलेल्या प्रकाराची दखल घेऊन युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ,मुळदे येथे भेट दिली व मुख्य अधिकारी डॉ.प्रसाद हळवणेकर आणि गावडे यांना भेटून सदर शेतकऱ्यांसोबत घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. त्या वेळी हळवणेकर साहेबानी त्याच्या अधिकारी कडून शेतकऱ्यांना सोबत घडलेल्या प्रकारा बद्दल सर्व प्रथम दिलगिरी व्यक्त केली. व सदर रोप हवी असल्यास आता शेतकऱ्यांना Ddrbskkv@gmail.com जाऊन मेल वर तुम्हाला लागणारी जाती निहाय रोपे ,किती ?कुठे पाहिजेत,तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहून मेल करून परमिट साठी परवानगी घेवी लागते व तो परमिट बघूनच आम्ही रोपांचे अधिकृत वितरण करू शकतो असे सांगितले.
पण अश्या परमिट बद्दल व अन्य तुमच्या प्रक्रिये बद्दलची योग्य माहिती ही तुम्ही उपलब्ध करुन द्यावी कारण सर्व सामान्य शेतकरी आपला वेळ आणि पैसा खर्च करुन अपेक्षेने तुमच्याकडे येत असतो त्यांना नाराज न करता व तुमचा अधिकाऱ्यांनी उडवाउडवी ची उत्तर न देता गरजुना मदत करावी व सर्व माहिती आपल्या विद्यापीठाच्या एन्ट्री गेट वर लावावी व आपन सर्व सामान्य शेतकऱ्यांना सदरची माहिती उपलब्ध करून त्यांना समजावून सांगावे व मदत करावी असे सांगितले.तसे अन्य सूचना पण पदाधिकाऱ्यांनी दिली ते हळवणेकर साहेबानी मान्य केली व लवकर लवकर परमिट प्राप्त झाले की रोपे उपलब्ध करुन देऊ व आपल्या अधिकाऱ्यांना योग्य ती समजूत देण्याची मान्य केली व परत अशी सर्व सामान्य शेतकऱ्यांची गैरसोय व त्रास अधिकाऱ्यांकडून होणार नाही याची ग्वाही दिली व दिलगिरी व्यक्त केली झालेले समज- गैरसमज, सिस्टीम मधल्या त्रुटी दुरुस्ती करू आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य ती माहिती देण्याचा आश्वासन साहेबांनी दिले . त्यांच्या काही अडचणी पण त्यानी सांगितलं त्या वेळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सरकार मार्फत शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू असे पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.तसेच तिकडे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या मदतीची सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी युवक काँग्रेस कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा सरचिटणीस ॲड.हितेश कुडाळकर, तालुका अध्यक्ष राजू धारपवार, कुडाळ उपशहर अध्यक्ष प्रकाश वेंगुर्लकर, उपाध्यक्ष प्रसाद पाताडे तसेच शेतकरी अभिषेक दळवी, एकनाथ मांजरेकर,दत्तप्रसाद दळवी व अन्य शेतकरी बांधव उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page