You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु..

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु..

मालवण /-

मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर मध्ये ५० जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच यंत्रसामग्री, औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याचबरोबर रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. प्रफुल्ल सावंत सेवा देणार आहेत यांसह चार नर्स, वोर्डबॉय नेमण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराची चांगली सोय उपलब्ध झाली आहे.मालवण शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. मालवण तालुक्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक , जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्या प्रयत्नांतून मालवण येथे सुस्सज डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले आहे. सध्या याठिकाणी २० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनीही यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये,श्री.पाटकर, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, शहरप्रमूख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, भाई कासवकर मुख्याधिकारी संतोष जिरगे, तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा