सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..

सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे ते पती होत..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे पती समीर नाईक यांचे गुरुवारी रात्री 8-30 च्या दरम्यान कोल्हापूर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून समीर नाईक यांनी आपल्या कालावधीत विविध विकास कामे आणली होती.तसेच गोरगरिबांनाही ते मदतीचा हात नेहमी पुढे करत असत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून समिर नाईक यांची ओळख होती.तर मित्र परिवारही त्यांचा खुप मोठा आहे.तसेच ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते.त्यांच्या अचानक एक्सिटमुळे वेतोरा गावासह वेंगुर्ला तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अभिप्राय द्या..