नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन..

नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन..

मालवण /-
४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत फोनद्वारे होणार आहे. (02365252032) या नंबर फोन केल्यावर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्या नुसार उपलब्ध लस साठ्यानुसार तसेच नोंदणी क्रमानुसार नागरिकांना लसीकरणसाठी बोलावले जाईल. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

४५ वर्ष वरील नागरिकांना ऑफलाईन पध्दतीने लसीकरण सुरू आहे. मात्र लस आल्यानंतर लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले.

तहसीलदार अजय पाटणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी यांनी याबाबत नियोजन केले आहे.

लस साठा जसा उपलब्ध होईल त्यानुसार ज्यांनी ग्रामीण रुग्णालयात नोंदणी केलेली आहे, त्या यादीतील प्रथम नोंदणी केलेल्या क्रमानुसार लसीकरण निश्चित केले जाईल. लस साठा उपलब्द झाल्यानंतर लसीकरणच्या आदल्या दिवशी किती लस साठा आला. नोंदणी केलेल्या कोणत्या क्रमांकापर्यंत लस मिळणार ही माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून तसेच फोनद्वारे कळवली जाईल.

तरी ४५ वर्ष वरील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी फोन द्वारे नाव नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..