परुळे /-


म्हापण गावातील ४५ वर्षावरील नागरीकांसाठी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ म्हापण ग्रामपंचायत येथे करण्यात आला. याआधी प्रा.आ. केंद्रात नागरीकांना जावे लागत असे व त्यामुळे तेथे होणारी गर्दी लक्षात घेवून सरकारने ग्रामपंचायत स्तरावर त्या त्या गावातील नागरीकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असुन त्याचा शुभारंभ म्हापण ग्रामपंचायत येथे आज करण्यात आला. यावेळी मिळालेल्या १३० लसींच्या कोट्यातून १००% लसीकरण करण्यात आले.या लसीकरणासाठी परुळे प्राथ. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री हिरेमठ, श्रीम. टी. डी. मुणनकर – आरोग्य सहाय्यीका, श्रीम. एस. एस. वालावलाकर – आरोग्यसेविका, श्री. प्रविण परब – आरोग्य्सेवक, श्रीम. रंजना मुंडये – स्त्री परीचर यांनी लसीकरणात सहभाग घेतला. तसेच म्हापण सरपंच श्री. अभय ठाकुर, उपसरपंच श्री. अशोक पाटकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. सावळाराम म्हापणकर, तसेच श्री. जगदीश म्हापणकर श्री रघुनाथ जुवाटकर यांनी बहुमोल सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page