वेंगुर्ला /-


रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.२६ एप्रिल २०२१ रोजी तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले येथे आमदार दिपक केसरकर यांनी तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियंत्रण सोयी सुविधा नियोजन विषयावर तालुकास्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सत्र घेतले होते.त्यावेळी गावपातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे नियोजना संदर्भात चर्चा झाली असता सभेस उपस्थित तहसिलदार प्रविण लोकरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर आदी अधिकाऱ्यांसमोर शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी पुढील प्रकारे नियोजन केल्यास कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांना लस चा लाभ मिळवून देऊ शकतो अशी आग्रही मागणी केली होती.रेडी प्रा. आ.केंद्र – सहा उपकेंद्रे,तुळस प्रा.आ. केंद्र – सहा उपकेंद्रे,आडेली प्रा. आ. केंद्र – पाच उपकेंद्रे,परुळे प्रा. आ. केंद्र – सहा उपकेंद्रे अशी
आपल्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्राची उप केंद्रामध्ये विभागणी आहे. जवळपास प्रत्येक मुख्य गावात एक तरी उपकेंद्र कार्यान्वित आहे.अशा ठिकाणी लस देण्याचे नियोजन केले तर कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देता येईल.ज्या ठिकाणी उपकेंद्र ची जागा लहान स्वरूपात असेल तेथील प्राथमिक शाळा ताब्यात घेऊन तिथे लसीकरण होऊ शकते.महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कुलिंग सिस्टम चा, यावर तोडगा म्हणून सध्या ज्या ठिकाणी कुलिंग सिस्टम ची सोय उपलब्ध आहे तिथून कुलिंग करिअर बॉक्स जे ३ ते ४ तास कुलिंग राहू शकतात अशा बॉक्स मधून लस चा साठा पुरवू शकतो.यावेळी तहसिलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियोजन चांगले असून आपण सदर नियोजन वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सुरुवात करू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे काल पासून प्रायोगिक तत्वावर वेंगुर्ले व इतर तालुक्यातील काही प्राथमिक उपकेंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे.त्याचप्रमाणे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पाच ही उपकेंद्रांवर लवकरात लवकर लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यासाठी शिरोडा ग्रामकृती समिती व ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असे उगवेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page