कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रींची ओटी भरणे, पालखी सोहळा, खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे असे आव्हान करण्यात आले आहे.