वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.आज मंगळवार ४ मे रोजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन व सर्वपक्षीय तालुका अध्यक्ष,व्यापारी यांच्या समवेत वेंगुर्ले तहसिलदार कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.यावेळी संपूर्ण तालुक्यासाठी जनता कर्फ्यु करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.यावेळी प्रांत सुशांत खांडेकर,नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,सावंतवाडी पोलिस उपअधिक्षक रोहिणी साळुंखे,तहसिलदार प्रविण लोकरे,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,गटविकास अधिकारी उमा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर,पोलिस निरीक्षक तानाजी मोरे,डॉ.अतुल मुळे, सा. बां.विभाग प्रतिनिधी तसेच
शिवसेना जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सचिन वालावलकर,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम,व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर,उपाध्यक्ष राजीव पांगम, सचिव राजन गावडे,भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत,शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा व्यापारी संघ सेक्रेटरी जयवंत राय,अध्यक्ष राजन शिरोडकर,सतेज मयेकर,कौशिक परब व अन्य आदी उपस्थित होते.सदर जनता कर्फ्युमध्ये या १० दिवसांसाठी सकाळी ६ ते ९ या वेळेत केवळ दुधविक्री,पेट्रोल, डिझेल व आंबा विक्री सुरु राहील.इतर सर्वच आस्थापने बंद राहणार आहेत.ट्रान्स्पोर्ट,बांधकाम व इंडस्ट्रीज सुरु असतील.शेतीविषयक कामे करणे इ.बाबी यांना सूट दिलेली आहे.शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांमार्फत नाकाबंदी करण्यात येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निधीतून वेंगुर्ला तालुक्यासाठी २ ऍम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिलेल्या असून त्या लवकरच उपलब्ध होतील.सदर ऍम्ब्युलन्स वेंगुर्ले नगरपरिषदेच्या ताब्यात राहतील.तसेच सावंतवाडी विधानसभा मतदार संघसाठी सावंतवाडी येथे १ कार्डीऐक ऍम्ब्युलन्सची सोय केलेली असून ती कोव्हिड व्यक्तींना अत्यावश्यक सेवेसाठी तालुक्यात उपलब्ध होईल.तसेच शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह तात्काळ दुरुस्त करुन घेण्यात येणार आहे.ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे २-३ दिवसात नवीन डॉक्टर नियुक्त करण्यात येत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ग्लोव्हज,सॅनिटायझर,एन ९५ मास्क,पीपीई किट,थर्मल गन,प्लस ऑक्सिमीटर, स्टीमर,स्टेट्सकोप,पुरविणेत येतील.प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ऑक्सिजन कोन्सीट्रेटर प्रत्येकी १ याप्रमाणे पुरविण्यात येत आहे.ऑक्सिजन सिलेंडर,२ स्प्रे मशिन्स पुरविण्यात येत आहेत.तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रत्येकी १ वोशिंग मशिन देण्यात येत आहे.वेंगुर्ले नगरपरिषद साठी ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रे मशिन पुरविण्यात येत आहे.युनिलाईट यंत्र देण्यात येणार आहे.कोव्हिड केअर सेंटर येथे कोव्हिड व्यक्तीसाठी बेडशीट,पीलो कव्हर,मास्क,सॅनिटायझर, नॅपकिन, पीपीई किट पुरविण्यात येणार आहे.सध्याची वाढती गरज पाहता कोव्हिड केअर सेंटर वेंगुर्ले येथे ऑक्सिजनचे १० बेड सुरु करण्यात येणार असून वेंगुर्ले शहरामध्ये वेंगुर्ले नगरपरिषद मेडिकल असोसिएशन व स्थानिक डॉक्टर यांच्या मदतीने १० ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे.तसेच आरवली वैद्यकीय – संशोधन केंद्रामध्ये अतिरिक्त २५ बेडची सोय करण्यात येणार आहे.सध्या लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून नागरी भागात १८ ते ४४ व ४५ ते ६० या वयोगटासाठी जसजशी लस प्राप्त होईल,तसे वोर्डनिहाय वाटप होईल.तसेच ग्रामीण भागात गावनिहाय लसीकरण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page