वेंगुर्ले /-
वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ मंगळवारी ४ मे रोजी वेंगुर्ले तालुका शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय, सुंदरभाटले, वेंगुर्ले येथे शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या हस्ते कातकरी समाजातील व्यक्तींना शिवभोजन थाळी प्रदान करुन झाला.
वेंगुर्ले तालुक्यातील परप्रांतीय मजुरांना तसेच निराधारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या खाण्याजेवणाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने राज्यातील आघाडी शासनाने आघाडी शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांना तसेच त्या भागातील निराधारांना याचा लाभ व्हावा,यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाळी राबविण्यात आलेली आहे.मात्र वेंगुर्ले तालुक्यात सदर शिवभोजन थाळी चालू करण्याकरिता मक्त्यासाठी नोंदणी केलेली नसल्याने अद्याप वेंगुर्ले तालुक्यात शासकीय शिवभोजन थाळी चालू झालेली नाही. त्यामुळे परप्रांतीय मजूर व निराधारांना शासनाच्या कोरोना काळातील लढ्यामुळे उपासमारीची अवस्था येऊ नये. त्याकरिता खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांचे सहकार्याने तालुक्यासाठी शिवभोजन थाळीचे नियोजन करीत वेंगुर्ला तालुका संपर्क कार्यालय, सुंदरभाटले वेंगुर्ले येथे मंगळवार ४ मे पासून दररोज १०० ताटांची शिवभोजन थाळी सुरू करण्यात येत असल्याची माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांनी दिली आहे.यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, युवा तालुका प्रमुख पंकज शिरसाट, ओंकार पडवळ, शैलेश परुळेकर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या या उपक्रमास सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी भेट दिली.