कुडाळ /-
ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाकडे मोठ्या आदराने पाहिल्या जाते. सर्वसामान्य रुग्ण आजही डॉक्टरांना ‘देवदूत’ समजून त्यांचा आदर करतात, परंतु सिंधुदूर्ग चे जिल्हा शल्य चिकित्सक आपले सामाजिक दायित्व विसरून सर्वसामान्य रुग्णांची दिशाभूल करीत असल्याचा प्रकार सुरु आहे. कोविड रुग्णालयात रुग्णानसाठी बेड उपलब्ध असताना ही उपलब्ध नाही अशी खोटी माहिती दिली जात असल्याची तक्रार कुडाळ तालुक्यातील वालवाल चे सामाजिक कार्यकर्ते व प्रगत सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्हायाचे पालकमंत्री उदय सामंत यांचा कड़े केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, हे कान,नाक,घसा ( E.N.T.) तज्ञ, आहेत. त्यांचेकडून कोरोना रूग्णावर उपचार कसे काय शक्य आहे?प्रशासनाने या गोष्टीचा गांभिर्याने विचार करावा.असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.कोविडचा त्रास होणाऱ्यांना येथे जागाच शिल्लक नसल्याने बेड व व्हेंटिलेटर वाढविण्याची मागणी नागरीक, लोकप्रतिनिधी अनेक जिल्ह्यात करत आहेत. मात्र सिंधुदुर्गत बेड उपलब्ध असताना ही जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील रुग्णाना चक्क बेड नाही म्हणून सांगत आहेत .त्याचा अनेकांना अनुभव आला आहे आला. यापूर्वी अनेक नागरिकांनाही याच कारणाने आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, हे पत्रकार परिषद घेऊन 232बेड शिल्क असल्याचे धदान्त खोटे बोलत आहेत.बेड उपलब्ध असताना कोरोना रुग्णाना जिल्हायाच्या बाहेर उपचारासाठी का पाठवले जात आहे असे ही निवेदनात दयानंद चौधरी यांनी म्हटले आहे.पेशंट बाबत नातेवाईकांनी चौकशी केल्यास डॉक्टर श्याम पाटिल यांचे नाव सांगितले जाते. रुग्णाना योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत या बाबीचा उलेख ही निवेदनात करण्यात आला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन चे डोस ही रुग्णाना आवश्यक तेवढे दिले जात नाही.लोकप्रतिनिधी नी स्वतः पेशंट किंवा नातेवाईक यांच्या बरोबर बोलून सत्य परिस्थिति जाणून घ्यावी व रुग्णाना जीवदान द्यावे अशी मागणी दयानंद चौधरी यांनी आज मंगळवारी मीडिया शी बोलताना सांगितले आहे.