कुडाळ /-

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला सातत्याने अपुऱ्या डॉक्टरांचा सामना करावा लागतो आहे. गेली कित्येक वर्षात जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदे भरली गेली नव्हती. सातत्याने अपुऱ्या डॉक्टर वर्गामुळे सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत होता. गेले वर्षभर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने व विशेष करून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोव्हिड काळात केलेल्या नियोजनामुळे या संकटात सुद्धा चांगली ऋग्नसेवा आरोग्य यंत्रणा देऊ शकली आहे. परंतु सातत्याने आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडत होता. यासाठी जिल्हाधिकारी व शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी खाजगी डॉक्टरांची सेवा मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, गेली कित्येक वर्ष आमचा जिल्हा अपुऱ्या डॉक्टर व स्टाफ वर्गामुळे लोकांच्या रोषाला सामोरं जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60 डॉक्टरांची पदे रिक्त आहे हे ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे आपण विशेष प्रयत्न करून आमच्या जिल्ह्यासाठी पुरेसा डॉक्टर वर्ग द्यावा अशी आर्जवी मागणी केली होती. मंत्री टोपे यांनी आपल्या जिल्ह्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त डॉक्टर देण्याची तजवीज करतो, असे आश्वासन दिले होते. आज राज टोपे यांनी शब्द पाळला आहे. म्हणजेच 30 डॉक्टरांची नियुक्ती दिलेली असून, आज 24 डॉक्टर हजर झाले आहेत. त्याबद्दल सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना या. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत व मी काका कुडाळकर प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व पदाधिकारी धन्यवाद देत आहोत.श्री. काका कुडाळकर. प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्यला डॉक्टर देण्याचा दिलेला शब्द पाळला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page