वेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी आलेल्या अहवालात एकूण ४४ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये परुळे १,
शेळपी १,खवणे १,वेतोरे १,मठ १,तुळस १,आडेली १,
आडेली जांभरमळा २,मठ धुरीवाडा ३,उभादांडा ३,वजराट २,वेंगुर्ले शहर एरियात २,
म्हापण २,आरवली टेम्बवाडी १,शिरोडा गांधीनगर ४,शिरोडा ३,मठ कणकेवाडी ६ आणि वेंगुर्ले
शहर एरियात १० इत्यादी ठिकाणी असे एकूण ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
दरम्यान रविवारी २ मे रोजी आलेल्या अहवालात शहर व ग्रामीण भागात एकूण ५४ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले होते.तालुक्यातील सक्रिय संख्या २३९ इतकी झाली आहे.शहर एरियात तसेच ग्रामीण भागातील जनतेने कोव्हिड शासन नियमांचे गांभीर्याने पालन करावे,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..