वेंगुर्ले /-
वेंगुर्ले पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येवू नये,अशी सूचना सदस्यांनी वेंगुर्ले पंचायत समिती मासिक सभेत मांडली.वेंगुर्ले पं. स. ची मासिक सभा नुकतीच सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील,पं. स.सदस्य मंगेश कामत, शामसुंदर पेडणेकर,गौरवी मडवळ, प्रणाली बंगे, साक्षी कुबल, स्मिता दामले, सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागात सध्या कोरोना लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याने लोकांची ओरड आहे. तरी ग्रामीण भागात कोरोना लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यात यावा. तसेच या लसी उपकेंद्र येथे उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी सुचना यावेळी मांडण्यात आल्या.