कुडाळ /-
आज १ मे.महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन.या कामगार दिनानिमित्त मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज शनिवारी कुडाळ एसटी डेपोच्या सर्व आस्थापन भागातील सर्व ठिकाणी आणि एसटी बस स्थानक कुडाळ येथे संजू विरनोडकर तुमच्या सहायाने संपूर्ण कुडाळ बस डेपो आणि कुडाळ बस स्थानक स्प्रे सॅनिटायझेशन केले.एसटी प्रशासन आणि प्रवाशी यांना कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन राज्य उपाध्यक्ष श्री. बनी नाडकर्णी यांनी कामगार दिनानिमित्त हा उपक्रम कुडाळ येथे केला आहे.