कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन!

कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन!

कुडाळ /-

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने आज शनिवारी १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांना कुडाळ तालुका व्यापारी सांगटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी निवेदन देऊन व्यापाऱ्यांच्या समस्या सांगितल्या या निवेदनात त्यानी प्रामुख्याने लॉकडाऊन कालावधीमध्ये दुकाने ही 7 ते 11 हे टाईम वाढउन मिळण्यासाठी मागणी केली आणि 9 ते 11 असा टाईम व्यापाऱ्यांना वाढउन मिळावा असे पालकमंत्री उदय सामंत यांना सांगितले.यावेळी श्रीराम शिरसाट यांच्यासोबत सचिव श्री. भूषण मठकर ,संजय भोगटे ,अतुल बंगे श्री. नितीश म्हाडेश्वर उपस्थित होते.

पुढे शिरसाट म्हणाले की मा. मुख्यमंत्री साहेब यांनी जाहिर केलेल्या ब्रेक दे चैन या लॉकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून कुडाळ तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाने शासनास सहकार्य केले आहे. तसेच शासनाचा दिनांक २०/०४/२०२१ च्या संदर्भानुसार आदेशाप्रमाणे अत्यावश्यक दुकानांची वेळ कमी करून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत लागू करण्यात आली. सदरील आदेशाचे देखील व्यापाऱ्यांमार्फत तंतोतंत पालन केले गेले आहे.असे सांगितले.

अभिप्राय द्या..