कोविड 19 च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘ उमेद वेंगुर्ला’ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला देणार साथ..

कोविड 19 च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘ उमेद वेंगुर्ला’ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला देणार साथ..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला येथे सामाजिक काम करणारी माझा वेंगुर्ला ही संस्था व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात गृह विलागीकरणात (होम आयसोलेशन)असणाऱ्या रुग्णांना अथवा या आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तिनां उपचाराची आवश्यकता असल्यास दूरध्वनी व व्हाट्स अँप च्या माध्यामातून तालुक्यातील तज्ञ डॉक्टर मोफत उपचार व मार्गदर्शन सल्ला देतील. तर माझा वेंगुर्ला चे तज्ञ समुपदेशक व कार्यकर्ते या आजारातील मानसिक तणावापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे समुपदेशन करणार आहेत.
या उपक्रमाची सविस्तर रचना व निश्चिती करण्यासाठी डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.अश्विनी माईणकर,डॉ.प्रसाद साळगावकर, डॉ.श्री व सौ काळे, डॉ.शिवशरण तर माझा वेंगुर्ला सदस्य श्री.राजन गावडे, श्री कपिल पोकळे, श्री. खेमराज कुबल, मोहन होडावडेकर हे सहभागी झाले होते.जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या सहयोगाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कोरोना बाधीत रुग्णांना उपचार मार्गदर्शन, या आजारात घ्यावयाची काळजी,कुटुंबातील इतर सदस्यांनी घ्यावयाची काळजी,लसीकरण गैरसमज,रुग्णालयात भरती होण्याच्या आवश्यकते संदर्भात मार्गदर्शन, मानसिक तणाव निवारणाबाबत मार्गदशन,या आजारानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.गरजू व्यक्तींनी कार्यक्रम समन्वयक मोहन-9423884516,शशांक-9689903379,ओंकार- 9096728200, समृद्धी – 9049144454, नम्रता- 9403802344यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..