वेंगुर्ला तालुक्यात आज २१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज २१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या अहवालात शहर एरियात व ग्रामीण भागात एकूण २१ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ येथे ६,अणसुर ३,वेतोरे १,आडेली १,न्हईचीआड १,मधला परबवाडा १ आणि वेंगुर्ले शहर एरियात ८ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तालुक्यातील सक्रिय संख्या १९२ इतकी असून यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ८२ व्यक्ती सक्रिय आहेत.

अभिप्राय द्या..