वेंगुर्ला / –
वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा येथील चंद्रसेन रुपाजी किनळेकर (वय ८२) निवृत्त आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी यांचे दिनांक २६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी तुळस प्रा. आ. केंद्र तसेच कसाल आरोग्य केंद्रात पर्यवेक्षक म्हणून काम केले होते.
जिल्हा परिषद मलेरिया विभागातील सागर किनळेकर, कुडाळ पोलीस ठाणे, पोलीस नाईक आशिष किनळेकर आणि तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक अभय किनळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ सुना, मुलगी,जावई,२ भाऊ, पुतणे, पुतण्या ,नातवंडे असा परिवार आहे.