जिल्हामुख्यालय येथे पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत..

जिल्हामुख्यालय येथे पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत..

सिंधुदुर्गनगरी /-

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग अधिनस्त असलेल्या एकूण चार प्रयोगशाळांपैकी एक जिल्हास्तरावर कार्यरत आहेत. जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशळेस राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण मानांकन प्राप्त झाले आहे.यासाठी जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग यांचे अधिस्विकृतीकरण अंतिम तपासणी मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी पार पडली . प्रयोगशाळेमध्ये सागर देसाई वरिष्ठ भूवैज्ञानिक, पुजा दिवाडकर रसायनी, समाधन ताटे अणुजैविक तज्ञ, हनुमंत जाधव प्रयोगशाळा सहाय्यक, रसिका सावंत प्रयोगशाळा सदतनीस तसेच उपविभागीय प्रयोगशाळेतील सर्व कर्मचारी यांनी त्यांची भूमिका अत्यंत अचूक व सक्षमतेने पार पाडली. याचा अतिशय चांगला प्रभाव सदर अंतिम तपासणी वर झाला व एन.ए.बी.एल. मार्फत नेमण्यात आलेले मुल्यनिर्धारक, निरीक्षक यांनी सर्व चमुचे कौतुक करत खुप चांगल्या प्रकारे तांत्रिक कामे करत असल्याचे मत व्यत केले. या सर्व प्रक्रियेमध्ये संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे, महाराष्ट्र राज्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपसंचालक कार्यालय कोकण विभाग येथील उपसंचालक डॉ.पं.ल.साळवे तसेच तेथील रसायनी स्वाती फुलसंदर, मिलींद वगारे, गोवेली उविप्र येथील कं. रसायनी ,सचिन तरमळे यांनी वेळोवेळी केलेली मदत व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने ही प्रक्रिया सुलभतेने पार पडली व जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग ही राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण (NABL)मानांकन प्राप्त झाली . जिल्हयातील शासकीय संस्था,महानगर पालिका,निमशासकीय संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांचे स्तरावरुन खाजगी नमुने पाणी गुणवत्ता तपासणीकरिता प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळांमध्ये खाजगी नमुने शासकीय शुल्क भरुन तपासून अहवाल दिले जात असल्याची माहिती प्रभारी विरिष्ठ भूवैज्ञानिक सागर देसाई यांनी दिली .

अभिप्राय द्या..