कुडाळ /-
कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाझारचे मालक रणजित दिनकर शिंदे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ०७ ते.११ वा वेळेनंतरही दुकान चालू ठेवले व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सद्यस्थितीचा विचार करता गरजेपेक्षा जास्त म्हणजे २० कामगारांना दुकानात कामावर ठेवले या प्रकरणी त्यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक तेवढेच कामगार कार्यरत ठेवावेत. अनावश्यक गर्दी करु नये.किराणा मालासह सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने स. ७ ते दु. ११ या वेळेतच सुरू ठेवावीत. अशा प्रकारचे आदेश दिले असताना जिल्हाधिकारी यांच्या या मनाई आदेशाचे उल्लंघन करत कुडाळ येथील सुपर ग्राहक बाजारचे मालक रणजित दिनकर शिंदे यांनी आपले किराणा मालाचे दुकान दुपारी ११.४५ वा. पर्यंत सुरू ठेवले. याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शिंदे, श्री फर्नाडिस, रूपेश सारंग यांनी त्याठिकाणी जात कारवाई केली. यावेळी शासनाच्या निर्धारित वेळेपेक्षा ४५ मि.दुकान उशिरा पर्यंत चालु ठेवत गिऱ्हाईकांना सामान देत होते.तसेच शासनाने कोणत्याही कामाच्या ठिकाणी कमीत कमी कामगार ठेवावेत असे असताना पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान २० कामगार कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे कुडाळ पोलिसांनी दुकान मालक रणजित शिंगे यांच्यावर भादवि कलम १८८ ,२६९ व २७० अन्वये कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस रूपेश सारंग यांनी दिली.