अडेल- तट्टूअधिकाऱ्यांमुळे कुडाळ मुख्याधिकारी यांच्याबाबतीत घडला प्रकार.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर यांचा वकत्व..

अडेल- तट्टूअधिकाऱ्यांमुळे कुडाळ मुख्याधिकारी यांच्याबाबतीत घडला प्रकार.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर यांचा वकत्व..

कुडाळ /-

गुरुवारी २२ एप्रिलला कुडाळ नगरपंचायत मद्धे न.प.च्या मुख्याधिकारी श्री.नितीन गाढवे यांच्या बाबतीत जो शाब्दिक चकमक प्रकार घडला याबाबतीत सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांना चांगले वाईट अनुभव आले असणार त्याचा शेवट २२ तारीकला घडलेल्या प्रकाराने दाखवून दिला.असे नेरूर येथील शिवसेना शाखा प्रमुख श्री.बाळा पावसकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून आरोप केला आहे.अश्या प्रकारच्या अडेल- तट्टूअधिकाऱ्यांचा अनुभव हा समाजातील सर्वसामान्य जनतेला देखील येत असतो,मात्र ते मूग गिळून गप्प असताता. काहीवेळा तर हे अधिकारी सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारी /या खासगी कामे करतात. पण काही वेळा नियमात बसणारी कामे वेळकाढू धोरणाने थांबून ठेवतात.याचा त्रास लोकप्रतिनिधीना होतो.परिणामी अश्या प्रसंगांना लोकप्रतिनिधी बळी पडतात…कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकार्यांच्या मुजोरपणाचा हा एका नगरसेवकाने वाच्या फोडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मुख्यधिकारी पाठिंबा देण्यासाठी एकवटले जिल्ह्यातील प्रत्येक मुख्याधिकारी यांनां माहीत आहे की आपण कसे वागतो यासाठीच पाठिंबा देण्यासाठी पुढे आले असावे असे नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन सांगितले आहे.

अभिप्राय द्या..