मालवण /-.

मालवण /
जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली. जिल्ह्यातील हे पहिलेच खासगी कोविड सेंटर असून या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली.
निलक्रांती संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे कोरोना केअर सेंटरसाठी प्रस्ताव सादर केला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या कोळंब येथे असलेल्या केंद्रास कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. जिल्हा प्रशासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता दिली आहे.
या केंद्रात १२ रुग्णांची व्यवस्था असून त्यासाठी लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुरविणार आहे. २९ एप्रिलला या केंद्राचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खालीपे यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्यातील खासगी संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेऊन कोरोना प्रसार थांबण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पुढे याव्यात असे आवाहन श्री. तोरसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page