वेंगुर्ला /-
खासदार विनायक राऊत यांनी आज मंगळवारी वेंगुर्ला येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली .यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब,तहसिलदार प्रविण लोकरे,गटविकास अधिकारी उमा पाटील,नायब तहसिलदार नागेश शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर आदी उपस्थित होते.तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी वेंगुर्ला येथे भेट दिली.
