देवगड /-
देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी ब्राह्मण देव मंदिर ते पंतवालावलकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदच्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रस्ता काम जिल्हा वार्षिक नियोजन निधी मधून मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्यात २०० मीटर कामास मंजुरी मिळाली आहे. यावेळी मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव, सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत, निलेश परुळेकर, संजय परुळेकर, मनोज सावंत, निषाद परुळेकर, संतोष परुळेकर, माजी सरपंच सायली बागवे, बाबू मुणगेकर,तुषार पंतवालावलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.