आरोग्य केंद्रात घुसला ‘इंडियन कोब्रा!’

आरोग्य केंद्रात घुसला ‘इंडियन कोब्रा!’

मसुरे /-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात शासनाचे आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास नेहमी प्रमाणे आरोग्य कर्मचारी कामात असताना अचानक पणे ‘तो’ दृष्टीस पडल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. लागलीच ‘त्याला ‘ पकडत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरेच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये इन्व्हर्टरची बॅटरी ठेवलेल्या टेबलच्या खाली सुमारे साडे तीन फूट लांबीचा सर्प कर्मचाऱ्यांना दृष्टीस पडला. लागलीच याबाबत कोकण वाइल्ड लाइफ रेस्क्यू फर्म सिंधुदुर्ग चे सदस्य
मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर याना कळविण्यात आल्या नंतर रमण यांनी सदर सर्पाला पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले. इंडियन कोब्रा या प्रजातीचा हा सर्प असल्याची माहिती रमण पेडणेकर यांनी दिली असून नागरी वस्तीमध्ये सर्प आढळून आल्यास त्याला न मारता आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..