सिंधुदुर्गात ड्युटीवर असणारे ड्रायव्हर ,कंडक्टर यांना मुंबईत पाठवू नये.;मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

सिंधुदुर्गात ड्युटीवर असणारे ड्रायव्हर ,कंडक्टर यांना मुंबईत पाठवू नये.;मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

कुडाळ /-

राज्यभरात कोरोनाच्या विषाणूचे थैमान सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विषाणू हातपाय पसरवत आहे.या सगळ्या परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषत: कुडाळ तालुक्यातील एस.टी.चालकांना कोविड बाधित मोठ्या शहरांत ड्युटीवर पाठवल्यामुळे त्यातील काही चालक ‘पॉझिटिव्ह’ निघाले आहेत. त्यामुळे कुडाळ तालुक्यात कोविडचे प्रमाण आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कंडक्टर आणि ड्राईव्हर यांना मुंबईत पाठवू नयेत अशी मागणी आज कुडाळ येथे मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष श्री.बनी नाडकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.ड्युटीवर असणारे ड्रायव्हर जर पॉझिटिव्ह निघाल्यास त्यांचा खर्च कोण उचलणार व जीवीताची हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून आपण पालकत्वाच्या नात्याने त्यांच्यावर अन्याय होऊ न देता त्यांची योग्य काळजी घ्यावी व त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवू नये ड्युटीवर असणारे ड्रायव्हर,कंडक्टर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील माणसांची जबाबदारी कोण घेणार असे वेगवेगळे विषय बनी नाडकर्णी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले.

अभिप्राय द्या..