सेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;

सेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;

कणकवली /-

नगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कणकवली तालुक्यात आढळताहेत. त्यातही कणकवली शहराची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची मोफत औषधोपचार व जेवणखाण्याची सोय करण्यासाठी कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगरपंचायत मालकीच्या पर्यटन सुविधा केंद्रात 25 बेडचे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले. रुग्णांसाठी सर्व सोयी निर्माण करून सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारून 4 दिवस उलटले तरीही अजून प्रशासनाने परवानगी दिली नसल्यामुळे या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल होऊ शकत नाहीत. रुग्णांना नाईलाजाने खाजगी कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती व्हावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण भरती करण्यास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. नगरपंचायत राज्य शासनाशी संलग्न संस्था आहे. नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल कोव्हीड बाधीत रुग्णांना दोन्ही वेळचे मोफत उत्कृष्ट आणि पौष्टिक भोजन, नाश्ता , पाणी, साफसफाई याची पूर्ण जबाबदारी नगरपंचायत घेणार आहे. फक्त डॉक्टर आणि आवश्यक नर्स प्रशासनाने देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरकडे दुर्लक्ष करत असून याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसत असल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी निदर्शनास आणले.आधीच कणकवली शहरातील मागील 4 ते 5 दिवसांतील स्वॅब टेस्ट रिपोर्ट पेंडिंग आहेत. दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये कणकवली शहरातील कोव्हीडबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास त्या रुग्णांना कुठे ठेवणार ? हा प्रश्नही आहेच. सध्याच्या शासकीय कोव्हीड केअर सेंटर पासून नगरपंचायत चे कोव्हीड केअर सेंटर हे शहरालगत आहे. त्यामुळे तात्काळ या कोव्हीड केअर सेंटर ची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रुग्ण दाखल करून घेण्यास मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..