सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 262 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ३४४ कोरोना मुक्त झाले आहेत. तर १२ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.