अनेक प्रकारच्या कर्जावरील व्याजदर अर्धा ते दोन टक्के झाले कमी..

जिल्हा बँकेने आपल्या सभासद संस्थांना तसेच वैयक्तिक थेट कर्जदारांठी १ एप्रिल २०२१ पासून वितरीत होणाऱ्या कर्जासाठी अर्धा ते २ टक्क्या पर्यंत व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षभर कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने सभासद संस्था, सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी वर्गाचा विचार करून सर्व प्रकारच्या कर्ज योजनेच्या व्याज दरात कपात केली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांनी केले आहे. अल्पमुदत शेतीसाठी ३ लाख वरील कर्जावर १ टक्के व्याज कपात केली आहे. पशुसंवर्धन व मच्छ व्यवसाय २ लाख वरील कर्जासाठी १ टक्के व्याज कपात केली आहे. खावटी व शेती पूरक कर्जासाठी अर्धा टक्के व्याज कमी केले आहे. तर मध्यम मुदत शेती कर्ज घेतल्यास फळबाग लागवड जमीन सुधारणा शेतघर बांधणीसाठी १ टक्का व्याज कमी करण्यात आला आहे. वासरू, संगोपन , पोल्ट्री , वराह , ससेपालन , बैलजोडी , रेडेजोडी , बायोगॅस यासाठी अर्धा टक्का व्याज कपात करण्यात आली आहे. दीर्घ मुदत शेती प्रकारातील शेतजमीन खरेदीसह फळझाड लागवड यासाठी १ टक्के व्याज कमी करण्यात आले आहे. शेती क्षेत्र तारण कृषी सन्मान योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जावर १ टक्का व्याज कमी करण्यात आले आहे. बिगरशेती अल्पमुदतमध्ये गणेश मूर्ती व इतर अर्धा टक्के, सोने तारण व सोने खरेदीसाठी कर्ज अर्धा टक्के व्याज कपात करण्यात आली आहे. बिगरशेती मध्यम मुदत कर्जातील गोदाम , शीतगृह , निवास न्याहारी , सेवा उद्योग व्यापारी गाळे , हॉटेल , पर्यटन अर्धा टक्के व्याज कपात करण्यात आली आहे. सहकारी संस्थ्यांसाठी जमीन, इमारत, गाळा खरेदी, बांधणी यासाठी १ टक्के व्याज कपात करण्यात आली आहे. वैयक्तिक थेट कर्जासाठी १ टक्के, घर बांधणी , सदनिका खरेदी अर्धा टक्का, घर बांधणी , सदनिका खरेदी (सॅलरी प्लस) ७५ टक्के व्याज कपात करण्यात आली आहे. वाहन कर्ज प्रकारातील वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदीसाठी अर्धा टक्के कपात, व्यावसायिक कारणासाठी १ तकाजे कपात, सहकारी संस्थासाठी २ टक्के कपात, शैक्षणिक कर्ज ५० टक्के कपात, संगणक , टॅब , व इतर संगणकीय साहित्य खरेदीवर १ टक्के कपात, तारणी कर्ज (ठेवी) प्रकारात राष्ट्रीय बचत पत्र , अल्पबचत ठेव तारण , किसान विकास पत्र यासाठी अर्धा टक्का व्याज कपात करण्यात आली आहे. इतर कर्ज प्रकारातील सौर ऊर्जा उपकरणे यासाठी १ टक्का व्याज कमी, शेतमाल प्रक्रियासाठी १ टक्के कपात, मजूर सहकारी संस्थासाठी अर्धा टक्का कपात, बलुतेदार संस्थासाठी १ टक्के कपात, पतसंस्था ( सभासदांना कर्ज वाटप करणेसाठी ) ०. ८० टक्के व्याज कपात, मच्छिमार संस्था ( स्वतः च्या अंगीकृत व्यवसायासाठी ) १ टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच २ दुभती जनावरे खरेदीसाठी कर्ज व्याजदर ९ टक्के करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश सावंत यानी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page