वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिडचा प्रभाव वाढतोय..

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिडचा प्रभाव वाढतोय..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज तब्बल २२ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये शहर एरियात ६ व्यक्ती व ग्रामीण भागातील १६ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ६,आरवली ३,टाक ५,होडावडा १,कर्ली १,उभादांडा १,खानोली १,मठ २ ,आडेली २ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.दरम्यान शहर एरियातील २ व्यक्तींचा कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे.शहरी तसेच ग्रामीण भागात कोव्हिड पॉझिटिव्ह वाढणाऱ्या संख्येमुळे नागरिकांनी गांभीर्याने शासन कोव्हिड नियमांचे पालन करावे,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..