कणकवली /-

कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली. सध्या 25 बेड रुग्णांना उपलब्ध करून दिले जात आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी 25 बेड उपलब्ध केले जातील. देवगड जामसंडे नगरपंचायत च्या वतीनेही देवगडमध्येही बुधवारी नॉन सिम्पटमिक रुग्णांसाठी 50 बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वैभवावाडीतही 50 बेड उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी गटनेते संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभि मुसळे, नगरसेवक ऍड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण , देवगडचे माजी उपसभापती तथा भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page