कणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट..

कणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट..

कणकवली /-

घराबाहेर पडलात तर खबरदार …कणकवलीत सरसकट सर्वांचेच सुरू आहे थर्मल स्क्रिनिंग..शनिवार रविवार च्या कडकडीत बंद नंतर सोमवारी सकाळी कणकवली शहरात सुरू असलेली वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधून काढली. तुम्ही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा अथवा अन्य कशासाठीही…आधी थर्मल स्क्रिनिंग करा.. कोरोनसदृश्य लक्षणे दिसल्यास तात्काळ त्याची रॅपिड टेस्टही करण्यात येत होती.नंतरच पुढे जा..पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, प्रोबेशनरी पीएसआय पाटील, वाहतूक पोलीस संदेश अबीटकर, कॉन्स्टेबल राकेश चव्हाण, होमगार्ड यांचे पथक सकाळी 7 वाजल्यापासून पटवर्धन चौकात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनचालक आणि पादचाऱ्यांना थर्मल स्क्रीनिंग च्या रांगेत उभे करत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी काढलेली ही नामी शक्कल चांगलीच उपयोगात आली आणि शहरात कर्नोपकर्णी असे कंपलसरी स्क्रिनिंग सुरू असल्याची बातमी पसरली. याचा परिणाम होऊन निष्कारण घराबाहेर पडणाऱ्यांना कुठेतरी शह बसणार आहे.

अभिप्राय द्या..