आरवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

आरवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला /-
आरवली येथे बाळा जाधव यांच्या निवासस्थानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य शीला बाळा जाधव यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आरवली येथे प्रथम महामानव डॉ. आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोकण विभागीय सीईओ राजन रेडकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष दाजी नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शीला जाधव यांचा दाजी नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यकारी सदस्य सौरभ नागोळकर, सदस्य राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्यासह संतोष चव्हाण, पांडुरंग जाधव, हर्षद जाधव, शुभम जाधव, ऋषिकेश जाधव, भूषण जाधव, प्रशांत कदम, विजय जाधव, सुरज जाधव आदींसह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळा जाधव यांनी मानले.

अभिप्राय द्या..