वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी(१४ एप्रिल रोजी)आलेल्या कोव्हिड १९ अहवालात सकाळी २९ व्यक्ती व सायंकाळी १० व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरी भागात २० व्यक्ती व ग्रामीण भागात १९ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.सकाळी वेंगुर्ले शहर एरियात तब्बल १७ कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती,तुळस ३,उभादांडा २,
आसोली १,परुळे २,
कर्ली १,शिरोडा १,सागरतीर्थ १
खानोली १ असे कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत.तर सायंकाळी आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्ती, मठ सिद्धार्थवाडी २,
आडेली १, वजराट ३ व
होडावडा १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page