वेंगुर्ला महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला / –

डॉ बाबासाहेबांनी भारत देशाचे संविधान लिहिले. मात्र आज एवढी वर्षे झाल्यानंतर हे संविधान वाचवण्याची वेळ आली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी नोकरी संदर्भात ज्या आरक्षित जागा आहेत त्या आज बाहेरील जिल्ह्यातील लोक येऊन भरत आहेत. याला याठिकाणचे अधिकारी सामील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील जनतेने आज जागृत होण्याची गरज असून स्वतः सक्षम होऊन याठिकाणची एकही जागा परजिह्याला जाता नये साठी प्रयत्न करावेत. हीच खरी डॉ. बाबासाहेबांना आदरांजली असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.
येथील महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला एम. के. गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, वामन कांबळे, चंद्रकांत जाधव, श्रुती रेडकर, अश्विनी पाटील, अरुणा परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..