वेंगुर्ला /-

पणजी वेंगुर्ले ही सायंकाळी ६.४५ वा. बसफेरी सुरु करणेबाबत वेंगुर्ले पं. स.उपसभापती सिद्धेश परब यांनी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले होते.तसेच याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.दरम्यान अत्यल्प भारमान व कोव्हीड १९ प्रादुर्भावामुळे कमी भारमानाच्या फेऱ्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने आंदोलनाचा अवलंब करु नये,असे विभाग नियंत्रक रा. प.सिंधुदुर्ग विभाग कणकवली यांनी परब यांना कळविले आहे.
उपसभापती सिद्धेश परब यांनी १३ एप्रिल पर्यंत ही बसफेरी सुरु करावी,अन्यथा १४ एप्रिल पासून सायंकाळी ६.४५ वा. पणजी वेंगुर्ले ही बसफेरी सुरु न केल्यास एकही बस शिरोडा येथून बाहेरगावी सोडली जाणार नाही,असा इशारा दिला होता.याबाबत संबंधित विभागाकडून कळविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की,सदर बसफेरी नोव्हेंबर २०२० पासून सुरु करण्यात आली होती.परंतु सदर फेरीस जाता येतानाचे प्रवासी भारमान अत्यल्प येत असल्याने ती २० मार्च २०२१ पासून स्थगित करण्यात आली.सदर फेरीचा दैनंदिन आढावा घेतला असता पणजी ते वेंगुर्ला असे फक्त ४ थेट प्रवासी प्राप्त होत होते.परिणामी सद्यकालावधी कोव्हिड १९ प्रादुर्भावामुळे आगाराच्या एकंदरीत भारमानावर परिणाम झाल्याने कमी भारमानाच्या फेऱ्या चालनात ठेवणे तांत्रिकदृष्टया शक्य नाही.कमी भारमानाच्या फेऱ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आढावा घेण्यात येतो व त्यानुसार सूचना देण्यात येतात.आपणाकडून मागणी करण्यात आलेली सदर आंतरराज्य फेरी चालनाचा एकंदरीत पुर्णानुभव पाहता ती चालनात आणणे आर्थिकदृष्ट्या महामंडळाच्या हितास्तव नाही.तरी सदर आंतरराज्य फेरी सुरु करण्याची केलेली मागणी भविष्यात प्रवासी प्रतिसादानुसार चालू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे विभाग नियंत्रक कणकवली यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page