मालवण शहरासह तालुकात स्फोट सदृश आवाज.;स्फोट की भूकंप याबाबत उलटसुलट चर्चा…

मालवण शहरासह तालुकात स्फोट सदृश आवाज.;स्फोट की भूकंप याबाबत उलटसुलट चर्चा…

मालवण /-

सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान स्फोटासारख्या झालेल्या प्रचंड आवाजामुळे शहरासह संपूर्ण तालुका हादरून गेला. हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
या आवाजामुळे शहरातील अनेक घरांना हादरे बसले. शहरातील मेढा-राजकोट ,भरड, एसटी स्टँड भागासह तालुक्यातील आचरा, कांदळगाव, देवबाग, देवलीसह अन्य भागात हा आवाज नागरिकांना ऐकू आला. या स्फोटसदृश्य आवाजाबाबत शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. काही जणांकडून समुद्रात स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही

अभिप्राय द्या..