डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात विविध संघटना कडून अभिवादन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात विविध संघटना कडून अभिवादन..

मालवण /-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी अभिवादन केले. तसेच बार्टी ,भारतीय बौद्ध महासभा, फुले शाहू आंबेडकर मंच, बहुजन समाज पार्टी, चर्मकार उन्नती मंडळ, टायगर ग्रुप यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, सौ.शिल्पा खोत , सौ.सनिता जाधव, पी. के. चौकेकर, सिध्दार्थ जाधव, संग्राम कासले, विलास वळंजू, सूर्यकांत कदम, पत्रकार महेंद्र पराडकर, भूषण मेतर, आस्था ग्रुपचे उमेश मांजरेकर, राहूल जाधव उपस्थित होते.
तर एस.टी स्टॅण्ड नजिकच्या समाज मंदिरात जयंती साजरी करण्यात आली यावेळी बबन मालवणकर,नायब तहसीलदार आनंद मालवणकर, पुरुषोत्तम मालवणकर, रविंद्र मालवणकर, बबन पेंडूरकर, संतोष जाधव, विलास देऊलकर, अॅड.सुमीत जाधव,नरेष वायंगणकर, सौ.स्मिता जाधव , सौ.विदया जाधव, नरेंद्र पेंडूरकर प्रा.नागेश कदम आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..