राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण,258 मृत्यू विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू..

राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण,258 मृत्यू विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू..

मुंबई, /-

राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.मराठवाड्यात ७,५९१ रुग्ण, ८७ जणांचा मृत्यू झाला. ८ जिल्ह्यांतील रुग्ण व कंसात मृतांचा आकडा असा : औरंगाबाद १४९२ (२३), जालना ७६८ (५), परभणी ५३२ (१५), हिंगोली २७९ (२), नांदेड (१७९८), लातूर १३३९ (६), उस्मानाबाद ६८० (५), बीड ७०३ (५).विदर्भात १३३ जणांचा मृत्यू झाला, तर ११,६८१ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ९९ जणांमध्ये नागपूरच्या ६९, भंडारा १६, चंद्रपूर १०, तर गोंदिया जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ १३, अकोला ८, अमरावती ७, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील प्रत्येकी ३ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात साेमवारी ९६४९, तर अमरावती विभागात २०३२ नवे रुग्ण आढळले.

अभिप्राय द्या..